Blog
वॉर रूम सेटअप म्हणजे काय?
निवडणूकीमध्ये समन्वय फार महत्त्वाची भूमिका बजावतो. हाच समन्वय प्रस्तापित करण्यासाठी आणि निवडणूकीची धुरा योग्यरित्या हाताळण्यासाठी वॉर रूम सेटअप फायदेशीर ठरत असतो. या माध्यमातून पुढील गोष्टी केल्या जातात.
१.ग्राऊंडवर होणाऱ्या उपक्रमांचे नियोजन करणे
२.सोशल मिडीया टिम
३.प्रचाराला दिशा देणे
४.जनसंपर्क दांडगा करणे
५.विरोधी उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना क्षमवणाऱ्या गोष्टी करणे
१.ग्राऊंडवर होणाऱ्या उपक्रमांचे नियोजन करणे
ग्राउंडवर कार्यकर्ते किंवा व्यवस्थापन टिमने काय केले पाहिजे या सर्वांचे नियोजन एकाच जागेवरून व्हावं यासाठी वॉर रूमची निर्मिती केली जाते. या रूममधून सर्व बाबींवर अभ्यास करून रणनीती अमलात आणण्यासाठी निवडणूक रणनीतीकार योजना आखत असतात. तसंच विविध सुचना टिमला करत असतात.
२.सोशल मिडीया टिम
या वॉर रूममधून सोशल मिडीयाची संपूर्ण टिम काम करत असते.यात विशेषत: सोशल मिडीयाच्या माध्यमातून उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी रणनीती ठरवली जाते. ही टिम क्रिएटिव्ह वर्क करत असते. जसं की व्हिडीओ तयार करणे, पोस्टर तयार करणे, डॉक्यूमेंटरी तयार करणे इ.
३.प्रचाराला दिशा देणे
सुरू असलेल्या प्रचारात कुठे कमी पडत आहोत,याचे योग्य विश्लेषण करून त्यानुसार सुधारित रणनीती बनवली जाते. या रणनीतीनुसार प्रचाराला योग्य दिशा देण्याचं काम या वॉर रूममध्ये केलं जातं. तसंच मतदारसंघाचा आवाका लक्षात घेता, जास्तीत जास्त मतदारांपर्यंत उमेदवार पोहचावा यासाठी काम करणे.
४.जनसंपर्क दांडगा करणे
निवडणूकांमध्ये उमेदवाराचा जनसंपर्क दांडगा करण्याचं काम याच वॉर रूम मधून केलं जातं. यात विशेषत: मतदारांशी संपर्क वाढवणं,त्यांच्याशी जवळीक साधून त्यांच्या भावना समजून घेणं. त्यांना वेळ देणं, त्यांच्या समस्या ऐकून घेणं, रात्री-अपरात्री अडचणीत असलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून जाणं इ.गोष्टी या वॉर रूमच्या माध्यमातून उमेदवारासाठी केल्या जातात.यातून उमेदवाराचा जनसंपर्क वाढवणं हा एकमेव हेतू असतो.
५.विरोधी उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना क्षमवणाऱ्या गोष्टी करणे
अनेकदा विरोधक उमेदवारावर भारी पडू शकतो.अशावेळी विरोधकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना वरचढ ठरतील अशा गोष्टी करणं यालाच योग्य रणनीती वापरणं असं म्हटलं जातं.याच नियोजनासाठी टिममध्ये समन्वय असणं गरजेचं आहे आणि याच साठी ही वॉर रूम काम करत असते.
Contact Us Today
- info@acharyaelections.com
- +91-8454860180