Blog

निवडणूकपूर्व सर्व्हे म्हणजे काय? त्याचे नेमके प्रकार किती?

डोर टू डोर सर्व्हे

निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारासाठी मतदार संघाचे सर्वेक्षण करून माहिती जमा करणे फार महत्त्वाचे ठरते. कारण,हा सर्व्हे निवडणूक प्रचाराची दिशा ठरवण्याची पहिली पायरी आहे. या सर्व्हेनुसार जर आपण प्रचाराची धुरा हाताळली तरच आपण निवडणूकीमध्ये यशस्वीपणे काम करू शकतो. याच सर्व्हेवर आज आपण चर्चा करणार आहोत.

सर्व्हे हा विविध प्रकारे केला जातो. या सर्व्हेच्या माध्यमातून आपण उमेदवारासाठी मतदारसंघातील खडान्-खडा माहिती मिळवून अचूक रणनीती ठरवू शकतो. हा सर्व्हे पुढील प्रकारांमध्ये केला जातो.

१.डोर टू डोर सर्व्हे

उमेदवारांच्या मतदारसंघातील मतदारांच्या घरापर्यंत पोहचून त्यांची माहिती, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांच्यावर कोणत्या पक्षाचा प्रभाव आहे,अश्या नानाविध प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी आणि त्यावर विश्लेषण करून योग्य रणनिती ठरवण्यासाठी डोर टू डोर सर्व्हे केला जातो.यातून मतदार संघात कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे, किती मतदार राहतात याची माहितीही मिळत असते.

२.सोशल मिडीया सर्व्हे

उमेदवाराचा जनसंपर्क दाडंगा करण्यासाठी तसंच तरूणाई पर्यंत पोहण्यासाठी सोशल मिडीया हे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाचा वापर करून उमेदवाराचा प्रचार यशस्वीपणे केला जाऊ शकतो. मात्र, हे करण्यासाठी मतदार संघातील किती जण सोशल मिडीयावर ऑक्टिव्ह आहेत. ते कोणत्या सोशल मिडीया प्लॅटफॉमचा सर्वाधिक वापर करतात अश्या विविध प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सोशल मिडीया सर्व्हे केला जातो.
उदा.मोदी लाट देशात येण्यासाठी हा सर्व्हे कारणीभूत ठरला होता.

३.कॉलिंग सर्व्हे

-बऱ्याचदा मतदार संघातील मतदार हे कामानिमित्त बाहेर असतात किंवा कामावर असतात.तसंच अनेकदा वातावरणीय परिस्थितीमुळे काही ठिकाणी पोहचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. अश्या परिस्थितीत मतदारांचा माहिती जमा करण्यासाठी कॉलिंग सर्व्हे करावा लागतो. या सर्व्हेतूनही अनेकदा बरीच माहिती उपलब्ध होत असते.

४.ओपिनियन पोल

मतदार संघातील मतदारांचा कोणत्या उमेदवाराकडे सर्वाधिक कल आहे.त्यातून निवडणूकीत कोण बाजी मारू शकतो. याची साधारण माहिती आपल्याला ओपिनियन पोलच्या माध्यमातून समजत असते. हा पोल निवडणूका जाहिर झाल्यानंतर मतदान होण्यापूर्वी तयार केला जातो. या पोलला बदलण्यासाठी अचूक रणनीती ठरवून त्यानुसार प्रचार धुरा हाताळल्यास हा पोल फेल ठरू शकतो. हा पोल विशेषत: माध्यमं काढत असतात.

या चार प्रमुख प्रकारानुसार सर्व्हे केला जातो. या सर्व्हेमध्ये आचार्य इलेक्शन मॅनेजमेंट तंतोतंत फायदेशीर बाबी सांभाळून उमेदवारासाठी विजयाची रणनीती ठरवते.