Blog
नवी मुंबईतील सर्वात वेगवान आणि पारदर्शी सेवा बजावणारी निवडणूक व्यवस्थापन संस्था
प्रस्तावना
निवडणूक हि देशाचं भवितव्य ठरवणारी महत्त्वाची बाब आहे. या निवडणूकांमधून जनतेचे लोकप्रतिनिधी लोकांसमोर येत असतात. लोकप्रतिनिधी हे त्यांचं विकासाचं व्हिजन मतदारांसमोर मांडतात. यातून मतदारांचा पाठिंबा मिळवतात आणि मग निवडणूकीत सर्वाधिक मतदारांच्या मतधिक्यांनी निवडून येतात.
अश्यात उमेदवाराला नियोजनबद्ध निवडणूक लढवण्यासाठी आचार्य निवडणूक व्यवस्थापन कंपनी स्वविकसित व्यवस्थापन यंत्रणेचा वापर करून संबंधित उमेदवाराला निवडून आणण्यासाठी, संबंधित उमेदवाराचं व्हिजन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यात कार्यरत राहते. तसंच संपुर्ण मतांचं व्यवस्थापन करते.
एखाद्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी प्रचार आणि प्रसार या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. तसंच आपण ज्या मतदारसंघातून उभे राहत आहोत,त्या मतदार संघांचा सर्वांगीण अभ्यास करणं संबंधित उमेदवारासाठी महत्त्वाचं असतं. यामध्ये मतदार संघांतील विकास कामे असतील, रखडलेली कामे असतील, मतदार संघातील समस्या असतील किंवा स्थानिक दुर्लक्षित राहिलेले प्रश्न असतील या सर्वांचा अभ्यास करून संबंधित उमेदवाराला निवडून आणण्यासाठी रणनीती ठरवावी लागते. अश्यावेळी उमेदवाराच्या या बाजू आचार्यची निवडणूक व्यवस्थापन यंत्रणा सांभाळत असते. हि यंत्रणा संबंधित उमेदवारासाठी संपुर्ण निवडणूकीचे व्यवस्थापन करते. हे व्यवस्थापन म्हणजेच प्रत्येक उमेदवाराच्या निवडणूक विजयाची पहिली पायरी.
‘आचार्य इलेक्शन मॅनेजमेंट कंपनी‘ हि आजवर बहुसंख्य उमेदवारांच्या विजयाची साक्षीदार राहिली आहे.आपल्या या कंपनीने या उमेदवारांच्या विजयाचे क्षण जवळून अनुभवले आहेत.
एखादा उमेदवार जर निवडणूकीला उभा राहणार असेल तर त्याला ग्राउंड सर्वे उपलब्ध करून देणे. मतदार याद्यांची माहिती मिळवणे. त्यावर योग्य विश्लेषण करून त्यानुसार मतदार संघातील लोकांसाठी विकासाचं व्हिजन संबंधित उमेदवाराला बनवून देणे. कोणत्या भागात कोणत्या समस्या आहेत. त्यावर तेथील लोकांसमोर कोणता विषय मांडणे गरजेचे आहे, याविषयीची संपुर्ण माहिती संबंधित उमेदवाराला उपलब्ध करून देणे, उमेदवार जिथे कमी पडतो, त्यावर भर देऊन त्याला योग्य मार्गदर्शन करणे, त्याचे व्हिजन मतदारांपर्यंत योग्यरित्या पोहचण्यासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करणे, उमेदवाराचा लोकांसोबतचा जनसंपर्क दांडगा करणे अश्या नानाविध गोष्टी करून उमेदवारासाठी अचूक रणनिती देण्याचं काम आचार्यची व्यवस्थापन यंत्रणा करते.
खरंतर यातून देशाच्या शाश्वत विकासासाठी सक्षम नेतृत्व घडवणे हे आचार्यचे व्हिजन आहे. हेच व्हिजन घेऊन आचार्य सध्या महाराष्ट्रभर यशस्वी घौडदौड करत आहे.
Contact Us Today
- info@acharyaelections.com
- +91-8454860180