लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीच्या धामधुमीनंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. शहराचे,गावाचे तिथल्या स्थानिक नागरिकांच्या समस्यांचं निराकरण स्थानिक पातळीवर करणं गरजेचं असते. तसेच सरकार आणि नागरिकांमधल्या संवादातील दरी वाढू नये, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना करण्यात आली. याच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महानगरपालिकेचा समावेश होतो. या निवडणुकीसाठी सर्वाधिक मताधिक्य आपल्याला मिळावं यासाठी पक्षांची आधीच चढाओढ सुरू झालेली आहे. स्थानिक राजकारणाचा पारा तापायला सुरूवात झालेली आहे. इच्छुकांच्या वरिष्ठांशी भेटीगाठी वाढल्याच्या दिसतात..यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी रणनिती आखणं सर्वात महत्त्वाचं ठरतं. सध्याच्या तंज्ञानाच्या जगात प्रभावीपणे प्रत्यक्ष फिल्डसाठी तसेच सोशल मिडियासाठी निवडणूक व्यवस्थापन कंपनी यासाठी काम करते.
कशा पद्धतीने निवडणूक व्यवस्थापन कंपनी काम करते
मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांचं म्हणणं ऐकून ते आपल्या विभागाचा प्रतिनिधी म्हणून कोणाला बघू इच्छितात हे जाणून घेण गरजेचं आहे. त्यासाठी ओपिनियन पोल घ्यावा लागेल. ओपिनियन पोल म्हणजे मतदानाच्या आधी विविध विभाग, प्रभागांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेण्याचं काम निवडणूक व्यवस्थापन कंपनी करत असतात. यामुळे मतदार सत्ताधारी पक्षाने केलेल्या विकासकामांवर किती समाधानी आहे की नाही, त्यांच्या अपेक्षा काय आहेत यासंबंधी माहिती मिळाल्याने मुद्देसुद रणनिती आखण्यात मदत होते.
पारंपारिक पद्धतीने ओपिनीयन पोल, सर्वेच्या माध्यमातून मिळालेल्या डेटाचा उपयोग करून सर्वसमावेशक अशी, मतदारांना आपल्याकडे आकर्षित करणारी रणनिती आखणं महत्तवाचं ठरतं. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात भारतात सोशल मिडिया वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना उमेदवाराने केलेली कामे, शहरासाठी,आपल्या प्रभागाच्या विकासासाठीचे व्हिजन आपल्या सोशल मिडिया, ऑनलाईन माध्यमातून मांडू शकतो. यासाठी कंपनी कोणत्या सेवा देतात ते आपण बघूया.
डूअर टू डूअर सर्वे –
डूअर टू डूअर सर्वेमध्ये प्रभागामधल्या नागरिकांच्या घरोघरी जाऊन माहिती गोळा करणे. या माहितीच्या आधारे मतदारांचे वयोगट, उमेदवाराच्या बाजूने, विरूद्ध तसेच जे मतदार तटस्थ आहेत लोकांचं प्राबल्य आहे हे समजण्यास मदत होईल. त्यानुसार अधिक प्रभावीपणे रणनिती आखून त्याची अंमलबजावणी करू शकतो. उमेदवाराला मतदारांशी थेट जोडण्यास या सर्वेचा उपयोग होतो.
सोशल मिडिया मॅनेजमेंट / वॅार रूम –
उमेदवाराचे इन्सटाग्राम, फेसबुक, ट्विटर या समाजमाध्यमांवर अकाऊंट बनवणे. जर अगोदर असतील तर त्याला सुस्थितीत, आकर्षक बनवले जाते. या अकाऊंटवरून उमेदवाराच्या दौऱ्यांची, सणांच्या शुभेच्छा तसेच लाईव्हच्या माध्यमातून लोकांशी थेट संवाद साधता येऊ शकतो.पोस्टर, रील व्हिडिओजमुळे क्लाईंट, त्यांचं काम सर्वदूर पोहचू शकतं. वॅार रूम म्हणजे आभासी जगातलं उमेदवार जिंकण्यासाठी निवडणूक व्यवस्थापन कंपन्याद्वारे लढलं जाणारं युद्धच असतं. ज्यामध्ये कंटेट रायटर्स, व्हिडिओ एडिटर,ग्राफिक डिजाईनर, फोटो-व्हिडिओग्राफर, रिसर्चर हे सगळे लढाई लढत असतात, जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतात.
वेबसाईट –
उमेदवाराचा online presence वाढवण्यासाठी वेबसाईटचा उपयोग होतो. उदा. उमेदवाराच्या नावाने गुगल सर्च केल्यास सर्वात वरती त्यांच्याबद्दलची माहिती, सोशल मिडिया प्रोफाईल आणि वेबसाईटची लिंक त्वरित मिळू शकते. या वेबसाईटमध्ये उमेदवाराने केलेले काम, योजनांची माहिती तसेच लोकांना आपल्या समस्या निवारण करण्यासाठी उपयोग होतो.
न्यूज पोर्टल –
बहुसंख्य लोक बातम्या अॅानलाईन वाचण्यावर भर देतात. प्रभागातील बातम्या, या आपण बनवलेल्या न्यूज पोर्टलवर अपलोड करू. निवडणूक जसजशी जवळ येत जाईल तसं उमेदवारासंबधीतल्या सकारात्मक बातम्या या पोर्टलवर टाकून कार्यकर्त्यांमार्फत व्हॅाटसअॅप तसेच इतर ठिकाणी वायरल करू शकतो.
बाईट –
उमेदवाराबद्दलचे मत, त्यांनी जर कामं केली असतील तर विभागातील लोकांना याबद्दल बोलायला सांगून त्यांचे बाईटस सोशल मिडियावर अपलोड करून मतदारांवर उमेदवाराची छाप पडण्यास मदत होते.
मुलाखत –
इमेज बिल्डिंगसाठी, विभागातील जनतेसमोर उमेदवाराची भूमिका मांडण्यासाठी मुलाखतीचा उपयोग होतो.
या मुलाखतीचे रिल स्वरूपातील व्हिडिओज त्यांच्या सोशल मिडियावर अपलोड केला गेल्याने अधिक लोकांपर्यंत वायरल होईल.
डॅाक्युमेंट्री –
निवडणुकीच्या काळात उमेदवाराच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणारी पाच ते दहा मिनिटांची डॅाक्युमेंट्री बनवली जाते. ज्यामध्ये त्यांचा इथपर्यंतचा प्रवास, त्यात आलेले चढ- उतार, तसेच प्रभागासाठीचे त्यांचे व्हिजन या माध्यमातून दाखवता येईल. ही डॅाक्युमेंट्री निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात एलईडी वाहनावर लावल्याने येता जाता लोकांच्या नजरेस पडेल.
AD Clip
जाहिरात या मतदारांवर आणि त्यांच्या उमेदवार निवडीवर प्रभाव टाकत असतात. कधीकधी निकालांमध्ये निर्णायक भूमिका बजावतात. चांगले अभिनेते आणि अभिनेत्रींना घेऊन उमेदवाराच्या कामाचा प्रचार आणि प्रसार जाहिरातीमधून केल्याने जनतेच्या मानसिकतेवर प्रभाव पडून निर्णायाच्या वेळी ते आपल्या बाजूने येऊ शकतात.
verified WhatsApp Blue Tick
मतदारांचं काम अधिक सोपं करण्यासाठी या सेवेचा वापर करण्यात येतो. ब्लू टिक अॅटो चॅट बोट हा संबंधीत उमेदवाराचा असतो. ज्याला मतदारांनी आपल्या मतदार कार्डचा नंबर टेक्स्ट केल्यास तो चॅट बोट मतदाराची डिजीटल वोटर स्लिप या माध्यमातून पाठवतो. त्यामुळे मतदारांचा वोटर स्लिप शोधण्याची गरज पडत नाही व त्यांचा वेळ वाचतो.
मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही ? नवीन मतदारांचे नाव जोडले गेले आहे की नाही ? नावामधील किंवा पत्त्यामधील बदल झालाय की नाही ? याची तसेच स्वत: च्या बूथची माहिती देखील मिळू शकेल.
या सर्व गोष्टी विचारात घेऊन निवडणूक व्यवस्थापन कंपनी काम करते. योग्य रणनिती आखून उमेदवाराला विजयी करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील अग्रगण्य आचार्य निवडणूक व्यवस्थापन कंपनी लीलया पार पडते.